ग्रीन फंगस काय आहे ? लक्षणे, आणि कोणती काळजी घ्यावी.

Nandkishor
कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर कोरोना मधून बरे झालेल्या रुग्णांना जगभरात वेगवेगळे फंगस इन्फेक्शन चे आजार आढळे आहेत. त्यामध्ये ब्लॅक फंगस, यल्लो फंगस आणि व्हाईट फंगस हे Infection आढळे आहेत.

आता, कोरोनातून बरे झालेल्या रुग्णाला ग्रीन फंगस हा नवीन Infection सापडला आहे. ग्रीन फंगस म्हणजे काय, ग्रीन फंगस ची लक्षणे काय आहेत याची माहिती करून गेऊया.

ग्रीन फंगस म्हणजे काय

ग्रीन फंगस ला Aspergillosis Infection (एस्परगिलोसिस इंफेक्शन) असे म्हणतात. ग्रीन फंगस हे एक दुर्मिळ Infection आहे. साधारणतः सामान्य असलेल्या फंगसचीच प्रजाती आहे. ज्याला मेडिकल भाषेत एस्परगिलस म्हटले जाते. ग्रीन फंगस की लागण किंवा Infection हे घरामध्ये किंवा घराच्या बाहेरही होऊ शकते. कोरोना आजारातून बऱ्या झालेल्या व्यक्तींमध्ये हा ग्रीन फंगस आढळत आहे.

एम्स रुग्णालयातील डॉ. रणदीप गुलेरिया सांगतात कि कॅंडिडा, एस्परगिलोसिस, क्रिप्टोकोकस, हिस्टोप्लास्मोसिस आणि कोक्सीडियोडोमायकोसिस असे अनेक फंगस चे प्रकार असतात. ज्या व्यक्तीची रोग प्रतिकारक शक्ती कमी आहे अश्या व्यक्तींना म्युकोरमायकोसिस, कॅडिडा आणि एस्परगिलोसिस या फंगस चे Infection होऊ शकते असे डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले.

ग्रीन फंगस म्हणजे काय? ग्रीन फंगस काय आहे ?
ग्रीन फंगस म्हणजे काय

ग्रीन फंगस का आणि कसा होतो

ग्रीन फंगस (एस्परगिलोसिस) चे सूक्ष्म विषाणू हे श्वसनाद्वारे शरीरामध्ये प्रवेश करतात. परंतु सामान्यपणे ज्या व्यक्तीचे immune system रोग प्रतिकारक शक्ती असते अशा व्यक्तीच्या शरीरामध्ये सहज प्रवेश करतो.

कोरोना रुग्णांमध्ये ग्रीन फंगस Infection होण्यामागे बरेच करणे आहेत. हृदयाचा त्रास किवा प्रोब्लेम, श्वास घेण्यास त्रास, स्टेरॉयड चा जास्त वापर, कमकुवत immune system असणे. फंगस इन्फेक्शन हा पसरणारा रोग किवा आजार नाही. ग्रीन फंगस हा एका व्यक्ती पासून दुसऱ्या व्यक्ती ला होत नाही.आणि प्राण्यामध्ये हि पसरत नाही.

ग्रीन फंगस ची लक्षणे काय आहेत

ग्रीन फंगस ची लक्षणे

श्वास घेण्यास त्रास होणे

नाकातून रक्त येणे

वजन कमी होणे

अशक्तपणा

ताप येणे

छातीत दुखणे

खोकला

खोकतांना रक्त पडणे


ग्रीन फंगस बाबत घ्यायची काळजी

  • कोणत्याही आजाराला म्हणा किंवा रोगाला होण्यापासून स्वतला वाचवायचे असेल तर, स्वच्छता ठेवणे खूप महत्वाचे आहे. आपल्या शरीराच्या स्वच्छते कडे लक्ष ठेवा.
  • आपले हात, चेहरा वारंवार साबणाने आणि स्वच्छ पाण्याने धुवा.
  • अशा ठिकाणी जाऊ नका की, ज्या ठिकाणी अधिक धूळ असेल किंवा दूषित / खराब पाणी असेल .
  • मास्क चा वापर करा.
ग्रीन फंगस काय आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळाली असेल असे मी ग्राह्य धरतो .आपल्या मित्रांना नातेवाईकांना  ह्या माहितीची आवशकता असल्यास त्यांना अवश्य शेअर करा.

टिप्पणी पोस्ट करा

Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.
×