वजन कमी करण्याचे उपाय | weight loss tips in Marathi

Nandkishor
वजन कमी करण्याचे उपाय, वजन कमी करण्यासाठी और्वेदिक औषधे, वजनाच्या कमी करण्यासाठी घरगुती उपाय.
धावपळीच्या जीवनामध्ये सध्याला अनेक लोकांना वजन वाढीचा सामना करावा लागत आहे. बदलत चाललेली जीवन शैली या मुळे अनेकांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही.

दरोरोज ची दिनचर्या अशी बनली गेली आहे कि आठ ते दहा तास काम करतात. त्याच बरोबर उपुक्त आणि पोषक जेवण आणि आहार करत नाहीत.

बाहेरील तेलकट जास्त प्रमाणात खात राहतात जसे वडा- पाव भजे तसेच जेवणामध्ये अधिक गोड आणि तेलकट पदार्थ खातातयाचा आरोग्यावर वाईट परिणाम दिसून येतो.

वजन वाढल्यामुळे तुमच्या पर्सनॅलिटीवर परिणाम दिसतो. जास्त लठ्ठ पणामुळे तुमी आकर्षक दिसत नाहीत.

वजन वाढल्यामुळे तुमच्या आरोग्यावर याचा पडसाद दिसतात. अनेक आजार उद्भवतात जसे कि उच्च रक्त दाब, पचन क्रियेवर परिणाम होणे, शरीरातील साखर वाढणे, कोलेस्ट्रॉल वाढणे, मानसिक तणाव वाढणे यासारखे आजार होऊ शकतात

{tocify} $title={Table of Contents} 

या लेखामध्ये वजन कमी करण्याचे उपाय, घरगुती उपाय आणि त्याविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे.

वजन कमी करण्याचे उपाय weight loss tips in Marathi
 

वजन कमी करण्याचे उपाय - Weight loss tips in Marathi

योग्य आणि आणि संतुलित आहार


लोकांचा असा समज आहे कि जेवण कमी केले तर वजन कमी होते, आणि कमी खाणे सुरु करतात. योग्य प्रमाणात प्रोटीन युक्त व संतुलित आहार घेतला पाहिजे. रोजच्या जेवणामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा समवेश केला पाहिजे. दिवसातून अनेक अनेक वेळा थोडे थोडे जेवण करावे एकदाच भरपूर जेवण करणे टाळावे. तुम्ही तुमचा weight loss करण्यासठी योग्य डायट प्लान बनवू शकतात किंवा diet specialist ची मदत घेऊ शकतात.

कोमट पाणी आणि लिंबू व मध


कदाचित तुम्हाला हा उपाय माहिती देखील असेल. लिंबू हे आपल्या शरीरातील विषयुक्त घटक बाहेर टाकण्याचे कार्य करते. याचाच उपयोग वजन कमी करण्यासाठी होतो. दररोज सकाळी एक ग्लास कोमट त्यामध्ये आर्ध्या लिंबुचा रस, एक ते दीड चमचा मध ध्यावा. आणि यामध्ये थोडीशी काळी मिरी टाकावी. हे पाणी नियमित दररोज सकाळी प्यावे. वजन कमी करण्यासाठी हा उपाय सर्वात उपयुक्त आहे.

वजन कमी करण्यसाठी पुरेसी झोप


पुरेसी झोप म्हणजे दुपारी झोप घेणे असे नाही. तर रात्रीच्याला कमीत कमी सात ते आठ तास घेणे होय. आपण रात्री अकरा बारा वाजेपर्यंत मोबाईल टीव्ही बघत बसतो त्याने आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो,त्याच बरोबर आपल्या शरीराला व मेंदू ला पुरेसा आराम मिळत नाही रात्रीची पुरेसी झोप आवश्यक आहे.

तेलकट आणि फास्ट फूड सेवन कमी करणे


वजन वाढण्या मागचे हे देखील प्रमुख कारण आहे. बहुदा अनेक जणांना बाहेरील तेलकट जसे वडापाव, भजे, सामोसे, पिझ्झा आणखी बरेच फास्ट फूड आहेत. काही पेकींग पदार्थ खातात.हे हानिकारक आहे यामधील बरेच पदार्थ बनवण्यासाठी आपण जी दरोजच्या वापरतील साखर नं वापरता आर्टिफिशियल साखर चा वापर करतात. हे पदार्थ चवीला खूप टेस्टी असतात परंतु यामुळे आपले वजन खूप जलद वाढण्यास सुरवात होते. त्यामुळे फास्ट फूड खाणे टाळावे.

वजन कमी करण्यसाठी ग्रीन टी


आपण दररोज सकाळी नियमित सुरुपात ग्रीन टी प्यायला पाहिजे. ग्रीन टी चे आपल्या शरीरासाठी अनेक फायदे आहेत त्यापैकी वजन कमी करण्यासठी याचा एक फायदा आहे ग्रीन टी मध्ये अँटीऑक्सिडेंट एपिगॅलोकॅटेचिन गॅलेट (ईजीसीजी) असतात हे शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करतात

ज्यूस पिण्या ऐवजी पाणी प्यासकाळच्या नाश्त्यामध्ये ज्यूस चा समावेश नसावा. यामुळे चरबी वाढते. त्याच्या जागी भरपूर प्रमाणात पाणी पिण्याची आवश्यकता पूर्ण करा.

प्रोटीन आणि फायबरयुक्त नाश्ता


रीसर्ज नुसार आपण जर योग्य प्रमाणात प्रोटीन चा आहार घेतला तर शरीरातील वाढलेली चरबी कमी होण्यास मदत होते. या शिवाय फायबरयुक्त पदार्थाचे सेवन केल्यास पोटाची चरबी कमी होते. यामध्ये मुख्यतः सूर्यफुलाचे बी, ब्रोकोली, एवोकाडो यांचा समवेश करावा.

ओवांचे पाणी पिणे


ओवांचे पाणी पिल्याने आपल्या शरीरात पुरेशा प्रमाणात उष्णता निर्माण होते आणि या बरोबच आपली पचन क्रिया देखील सुधारते. यासाठी रात्रभर एका वाटीमध्ये थोडासा ओवा भिजवत ठेवावा आणि सकाळी अनुशा पोटी म्हणजेच रिकाम्या पोटी या पाण्याचे सेवन करावे.

चालणे व मॉर्निंग वॉक


पोट कमी करणे करणे किंवा चरबी कमी करणे यासाठी चालणे हा कारगर उपाय आहे. तुम्ही दररोज सकाळी काही किमी अंतर चालले पाहिजे. कामाच्या ठिकाण जवळ असल्यास बाईक किंवा कार चा वापर नं करता पायी चालत जा नाहीतर सायकल चा वापर करा

थोडासा व्यायाम


सकाळी उठल्यावर थोडासा व्यायाम करावा याच बरोबर थोडा योगा देखील करावा. यात काही रेसिस्टेंट ट्रेनिंगचा समावेश करावा यामुळे चरबी कमी होण्यास मदत होते.


वजन कमी करण्यासाठी आयुर्वेदिक उपाय व औषधे


काळी मिरी


काळी मिरीचे आपल्या आरोग्यासाठी असंख्य फायदे आहेत. त्यातीलच एक आहे आपले वाढलेले वजन कमी करण्यासाठी. काळी मिरी हे आपले वजन कमी करण्यासाठी एक प्रकारचे वरदान आहे. वजन कमी करण्यासाठी काळी मिरी एक बुस्टर म्हणून ओळखले जाते. काळी मिरीचे सेवा केल्याने आपली पचन क्रिया हि चांगल्या प्रकारे काम करण्यास मदत होते. पचन क्रीया जर चांगली असेल तर वजन कमी होण्यास खूप मदत होते.

आद्रक / आले


आपण आद्रक चा उपयोग हा जास्त करून आपण चहा मध्ये आणि सर्दी झाल्यावरच करतो, परंतु आद्रक चा उपयोग हा वजन कमी करण्यासाठी देखील होतो. आद्रक हे एक आयुर्वेदिक वनस्पती आहे. आद्रक मध्ये आढळणारे घटक हे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती सुधारतात. शरीरात जमा झालेली चरबी कमी करण्यसाठी आद्रक चा वापर करतात. आद्रक हे आपल्या शरीरातील चरबी नस्ट / बर्न करण्यासाठी खूप फायदेशीर आहे

दालचिनी


दालचिनीची साल हि फक्त आपल्या जेवणातील स्वाद नं वाढवता. तीचे आयुर्वेदिक गुणधर्म फायदे देखील आहेत. दालचिनीची हि आपल्या शरीरातील मेटाबॉलिज्म सुधारते. वजन नियात्रणात ठेवते. आपण दालचिनीचा वापर चहामध्ये ग्रीन टी मध्ये देखील करू शकतो.

बडीशेप


आपल्या शरीरातील वाढत चाललेला लठ्ठ पणा कमी करण्यासाठी बडीशेप चा उपयोग करतात. बडीशेप हि आपल्या शरीरातील अनावशक चरबी, पोटाच्या बाजूची चरबी कमी करण्यासाठी बडीशेप चा उपयोग होतो. दररोज सकाळी रिकाम्या पोटी बडीशेप चे पाणी प्यावे.


हे आहेत वजन कमी करण्यासाठी उपाय आणि काही और्वेदिक औषधे .याच्या मदतीने वजन कमी होण्यास मदत होईल.

टिप्पणी पोस्ट करा

Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.
×