Peacock Information in Marathi | मोर पक्षी संपूर्ण माहिती

Peacock Information in Marathi. जगामध्ये अनेक प्रकारचे पक्षी आहेत. काही पक्षी शिकारी आहेत तर काही दिसायला खूप सुंदर आहेत. मोर पक्षी दिसायला खूप सुंदर आणि मोहक आहे. मोर पृथ्वीवरील सुंदर पक्ष्यामध्ये एक आहे. मोराला त्याच्या सुंदरतेमुळे पक्षांचा राजा म्हणून ओळखले जाते.

अप्रतिम सुंदरतेमुळे भारत सरकारने 26 जानेवारी 1963 रोजी भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केले. आपल्या शेजारील असलेला देश म्यानमार आणि श्रीलंका यांचा राष्ट्रीय पक्षी सुद्धा मोर हा आहे.

{tocify} $title={Table of Contents}

Peacock Information in Marathi -  मोर पक्षी माहिती 

पक्षांचा राजा आणि भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर दिसायला खूप सुंदर आणि चमकदार आहे. मोराचा पिसारा चमकदार हिरव्या रंगाचा आहे  आणि त्यामध्ये रंगीबेरंगी पिसारे असतात. आणि त्यावर व त्याच्या आजूबाजूस गुलाबी निळ्या पिवळ्या सोनेरी रंगांच्या छटा असतात. मोराची मान दिसायला सुंदर आणि लांब असते. मान निळ्या रंगाची आणि चमकदार असते. मुकुटा सारखा दिसणारा एक तुरा मोराच्या डोक्यावर असतो. मोराचे आयुष्य हे साधारणतः 15 ते 25 वर्ष इतके असते. शहरातील बऱ्याच मुलांना मोराचा आवाज ( Information of Peacock voice ) ऐकायला मिळत नाहीत . समोरील लिंक वर जाऊन तुम्ही मोराचा आवाज ऐकू शकता . मोराचा आवाज हा "टाहो" किंवा "केका" असा काढतो.

मोर हा पक्षी इतर पक्षांच्या तुलनेत थोडासा मोठा आहे. वजनाने जड असल्या कारणाने हवेत जास्त उंच हवेत उडता येत नाही. आणि जास्त वजन असल्यामुळे हवेत जास्त वेळ तरंगण्याची क्षमता देखील खूप कमी आहे. त्यामुळे मोर हवेमध्ये केवळ 25 ते 30 उंच उडतो, आणि काही वेळामध्येचं खाली जमिनीवर परत येतो. मोर जा जादा करून जमिनीवरच चालताना दिसतो

मोराची लांबी जवळजवळ 215 सेंटीमीटर (7 फुट) असते. मोर हा पक्षी झुंड करून राहतो त्यांच्या झुंडा मध्ये एक-दोन मोर (नर) आणि तीन-चार लांडोर (मादी) राहतात. आणि एकजुटीने अन्नाच्या शोधात बाहेर पडतात.

     वाचा:- पोपट पक्षी माहिती मराठी 

मोराचे मुख्य अन्न हे कीटक आहे. आणि याच बरोबर धान्य, फळांच्या बिया,फळे, तसेच शेतातील भुईमुगाच्या शेंगा, टोमटो, मिरची, आणि केली या फळांना जास्त प्रमाणात खातो. मोर लहान सापांना सुद्धा खातो परंतु तो सापा पासून लांब राहतो. मोराला शेतकऱ्याचा मित्र असे म्हणतात, कारण मोर शेतातील पिकाला नुकसान पोहचवणारे कीटक खातो जसे कि किडे, अळ्या, साप वैगेरे खातो .

Information of Peacock in Marathi
Information of Peacock in Marathi 

Peacock Information in Marathi

वाघ, कोल्हा आणि रानमांजर हे काही मोराचे शत्रू आहेत. शिकाऱ्यापासून आणि मांसाहारी प्राण्यापासून स्वतला वाचवण्यासाठी जास्त करून झाडावर राहतात. मोर खेड्यात नद्यांच्या किनार्यावर, डोंगर दऱ्यामधे हिरवळ ठिकाणे, हिरवी घनदाट वने या सारख्या ठिकाणी मोर रहायचे पसंद करतो .

जून महिन्याच्या सुरवातीला ज्यावेळेस काळे ढग येतात आणि पावसाची सुरवात होते तेव्हा मोर आपले पिसारा फुलवून थुई-थुई सुंदर नाचतो. त्या नृत्याला मयुरनृत्य असे म्हणतात.


information of peacock feather in marathi
information of peacock feather in marathi

मोराचे शास्त्रीय वर्गीकरण 

शास्त्रीय नाव  

पावो क्रिस्टॅटस

जीवसृष्टी

प्राणी

वंश

कणाधारी

जात

पक्षी

वर्ग

कुक्कुटाद्या

कुळ

कुक्कुटाद्य

जातकुळी

पावो

जीव

क्रिस्टॅटस


मोराचे धार्मिक महत्व

अनेक धार्मिक काथांमध्ये मोराला खूप महत्व दिले आहे. भगवा श्रीकृष्ण यांच्या डोक्यावर मुकुटामध्ये लावलेला मोराचा पिसारा (पंख) हा मोर पक्ष्याचे महत्व दाखवत आहे. हिंदू धर्मात मोर पक्ष्याचा संबंध हा देवी आणि देवतांशी आहे. भगवान विष्णू आणि कार्तिकेय यांचे वाहन हे मोर आहे. अनेक जन आपल्या घरात किवा देवघरात मोराचा पिसारा ठेवतात.

मोराच्या पिसाऱ्याची माहिती आणि उपयोग

घरातील सजावटीमध्ये बरेच लोकं मोराच्या पिसाऱ्याचा उपयोग करतात. वास्तू शास्रानुसार मोर पंखाचे खूप महत्व आहे. घरातील मुख्य प्रवेश द्वारा वर मोराचा पंख ठेवला असेल तर आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. घरात असलेला वास्तू दोष यामुळे बरा होतात.

मोराच्या पिसाऱ्याचा वापर पुष्पगुच्छ बनवण्यासाठी सुद्धा करतात. अनेक ठिकाणी मोराच्या पंखाना एकत्र मिळून उन्हाळ्यामध्ये हवा घेण्यासाठी हात पंखा बनवतात.

मोरांचे प्रकार

मोरांचा सरंक्षण कायदा

सुंदर आणि मनमोहक पिसाऱ्यामुळे जगभरात मोरांची शिकार केले जाते. भारतात पण मोरांच्या शिकारी होत असल्यामुळे मोरांची प्रजाती नष्ट होत चालली आहे. हे लक्षात घेऊन भारत सरकारने 1972 साली “मोर संरक्षण कायदा” मोरांच्या सुरक्षेसाठी आमलात आणला.

आपण सर्व पक्षांची काळजी घेतली पाहिजे. ते आपल्या निसर्गाचा एक महत्वाचा भाग आहे. त्यानाही आपल्या प्रमाणेच जगण्याचा अधिकार आहे.
 

मोराची माहिती व्हिडिओ द्वारे आज आपण काय शिकलो

आपल्याला मोर पक्षी माहिती Peacock Information in Marathi मिळाली आहे. त्यामध्ये मोराचे वर्णन, त्यांची शरीर रचना, त्यांचे अन्न माहिती घेतली. मोराची काळजी घेतली पाहिजे.  हा लेख आवडल्यास आपल्या मित्रांना पाठवा.

Previous Post Next Post