पोटाची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय | potachi charbi kami karne upay

Nandkishor
अनुक्रमणिका
पोटाची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय, pot kami karnyache upay, चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय, पोट कमी करण्याचे उपाय, झटपट वजन कमी करण्याचे उपाय, potachi charbi kami karne upay

आज आपण आपल्या आजू बाजूला पाहत आहोत कि, अनेक जन हे लठ्ठ पणा मुले त्रस्त आहेत. आपल्या शरीरातील जास्त चरबी आपल्या आरोग्यासाठी हानिकारक होऊ शकते.

काही व्यक्तींचे पोटाची चरबी वाढत चाललेली आहे. हा लेख खास करून त्यांच्या साठी आहे.यामध्ये तुम्हाला पोटाची चरबी कमी करण्याचे घरगुती उपाय माहिती देण्यात आलेली हे . यामध्ये आहार, व्यायाम,या विषयी माहिती आहे.
   

पोटाच्या आजू बाजूला थोडी फार चरबी असणे हि normal बाब आहे. पण हि चरबी हि जास्त प्रमाणात वाढत असेल तर हे आरोग्यास हानिकारक आहे. यामुळे वेगवेगळे आजार होऊ शकतात.

पोटाची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय

पोटाची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय

पोटाची चरबी कमी करण्यासाठी ग्रीन टी


पोट योग्य प्रकारे साफ व पोटाची चरबी कमी करण्यासाठी ग्रीन टी हे उत्तम घरगुती पेय आहे. ग्रीन टी मध्ये अँटी-ऑक्सिडंट हे गुणधर्म आहेत जे कि वजन नियंत्रणामध्ये खूप मदत करते. ग्रीन टी हा खास करून सकाळी घ्यावा. आणि दिवसातून किमान एक वेळा तरी ग्रीन टी प्यावा.

मॉर्निंग वॉक ( सकाळी चालणे )


सकाळी चालणे किंवा थोडेसे धावणे हा एक उत्तम उपाय / व्यायाम आहे पोटाची चरबी कमी करण्यासाठी. याच्या मुळे आपली पचन क्रिया हि सुरळीत चालू राहते आणि चरबी हळू हळू कमी होण्यास मदत होते.

फळे व भाज्या


संपूर्ण दिवसभरात आपण थोड्या फार प्रमाणात फळे व भाज्यांचा आहार घेतला पाहिजे. याच्या मुळे भूक कमी होते आणि लठ्ठपणा कमी होण्यास मदत होईल.


रात्रीचे जेवण


रात्रीचे अयोग्य जेवण हे पोटाची चरबी वाढण्याचे मुख्य कारण आहे. रात्रीच्या जेवणामध्ये हलके अन्न आणि त्याचे प्रमाणही थोडे असावे. झोपण्याच्या किमान दोन ते अडीच अगोदर जेवण करावे. रात्री जेवणानंतर गोड पदार्थ खाणे टाळावे

योग्य प्रकारे पाणी पिणे


सकळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यामध्ये मध आणि लिंबू टाकून प्यावा. याच्या मदतीने आपल्या शरीरातील कॅलरीज कमी होण्यास मदत होते व शरीरातील वाढलेली चरबी कमी होण्यास खूप मदत होते.

रोजचे जेवण आहार


पोटाची चरबी कमी करण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे आपला रोजचा आहार. आणि आपण तो कश्या प्रकारे घेतो. रोजचा आहार हा साधारण असावा. जेवणामध्ये जास्त गोड पदार्थ खाऊ नये. तळलेले पदार्थ टाळावे.

दुपारची झोप अयोग्य आहे

दुपारी झोपल्याने आपल्या शरीरातील फॅट्सचे प्रमाण वाढण्यास सुरवात होते. आणि लठ्ठ पणा येण्यास सुरवात होते. त्याच बरोबर अ पचन वाढते.

सकाळचा नाश्ता


सकाळचा नाश्ता केला पाहिजे! लोकांचा असा समज आहे कि, जर आपण सकाळचा नाश्ता नाही केला तर आपले वजन कमी होईल. पण असे नाही हे जर सकाळी नाश्ता केला नाही तर जेवणापर्यंत आपल्याला खूप भूक लागलेली असते आणि आपण भुके पोटी जास्त प्रमाणात जेवण करतो त्यामुळे वजन वाढण्यास सुरवात होते.

पोटाची चरबी कमी करण्यासाठी व्यायाम आणि योगासन


पोटाची वाढलेले चरबी करण्यासाठी आहार सोबतच व्यायाम आणि योगा तितकाच महत्वाचा आहे.

पोटाची चरबी कमी करण्यासाठी सेतुबंध योगासन

पोटाची चरबी कमी करण्यासाठी सेतुबंध योगासन

फोटो मध्ये दाखवल्या प्रमाणे
  • सर्वप्रथम पाठीवर झोपा. त्यानंतर गुढघे वाकवून कंबर वर उचला
  • घोट्याला दोन्ही हातानी पकडा
  • पाय आणि हात एकाच स्थितीत ठेवून श्वास घेत खाली वर दिशेने उचला
  • सेतुबंध आसनाच्या तुम्ही चार-पाच फेऱ्या मारू शकतात
  • कपालभाती योगासन
  • सुखासनाच्या मुद्रेत जमिनीवर बसा आणि डोळे बंद करा.
  • दीर्घ श्वास घ्या आणि सोडा.
  • आता हळूहळू नाकातून श्वास सोडा. जेव्हा तुम्ही श्वास सोडता तेव्हा पोट आतल्या बाजूला असावे.

अनुलोम-विलोम प्राणायाम

अनुलोम-विलोम प्राणायाम

  1. सुखासनाच्या मुद्रेत जमिनीवर बसा आणि डोळे बंद करा.
  2. आता उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीतून श्वास घ्या.
  3. आता उजव्या हाताच्या सर्वात लहान आणि सोबतच्या बोटाने डाव्या नाकपुडी बंद करा आणि उजव्या बाजूने हळू हळू श्वास सोडा.
  4. आता या स्थितीत राहून श्वास आत घ्या आणि नंतर उजव्या बाजूने नाक बंद करा आणि डाव्या बाजूने श्वास सोडा.

पोटाची चरबी वाढण्याची कारणे

पचनसंस्था कमजोर असणे


जस जसे आपले वय वाढायला सुरवात होते त्याच बरोबर पचन क्रिया कमकुवत होत जाते. हे सुद्धा पोटाची चरबी वाढण्याचे कारण आहे. साधारणता महिलांमध्ये जास्त प्रमाणात हि समस्या दिसते.

अनुवांशिकता


शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून असे समोर येते कि शरीरातील फॅट पेशी / सेल ह्या अनुवंशिकते मुळे विकसित होतात . जर तुमचे आई किंवा वडील हे जाड असतील तुमच्या पिढीला हि समस्या होऊ शकते.

बसून काम किंवा शरीराची हालचाल कमी असणे


सध्याला अनेक लोकांना कष्टाचे काम कमी आहे. ऑफिस मध्ये 8 ते 10 तास बसून काम असणे हे देखील प्रमुख कारण आहे पोटाची चरबी वाढण्याचे.







टिप्पणी पोस्ट करा

Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.
×