सर्दी घरगुती उपाय | sardi var upay.

Nandkishor
अनुक्रमणिका
सर्दी घरगुती उपाय, नाकातून पाणी येणे घरगुती उपाय, सर्दी, सर्दी घरगुती उपाय मराठी, sardi var upay, sardi sathi gharguti upay, सर्दी वर उपाय

वातावरणामध्ये बदल झाला कि आपल्याला सर्दी आणि शिंका येण्यास सुरवात होते. सर्दी हि एक प्रकारचा फ्लू आहे. हिवाळा आणि पावसाळ्यामध्ये सर्दी हि जास्तप्रमाणवर होते. एक दोन आठवडे झाले तरी बरी होण्याचे नाव घेत नाही.आम्ही तुमच्यासाठी सर्दी वार घरगुती उपाय याची माहिती दिलेली आहे. तुम्ही रोजच्या वापरातील काही पदार्थ वापरून सर्दी घराच्या घरी ठीक करू शकतो.

सर्दी घरगुती उपाय
सर्दी घरगुती उपाय

सर्दी ठीक करण्यासाठी घरगुती उपाय-

सर्दीसाठी हळद व दुध पिणे 


हळद हि सर्दीसाठी अत्यंत गुणकारी आहे. हळदीमध्ये असणारे अँटीइन्फ्लेमेटरी आणि अॅंटीसेप्टिक हे गुणधर्म आपली सर्दी ठीक होण्यास अत्यंत गुणकारी आहेत. याच्या मदतीने दोन ते तीन दिवसामध्ये आपली सर्दी ठीक होण्यास मदत होते.

याला आपल्या गावाकडच्या भाषेत शिपणे असे म्हणतात.

 1. ग्लास भर दुध ध्यावे, थोडासा गुळ घ्यावा ( चवी नुसार ) एक ते दीड चमचा हळद घ्यावी.
 2. हे मिश्रण थोडावेळ कमी गॅस वार उकळून घ्यावे.
 3. थोडेसे थंड झाल्यावर हे हळदीचे दुध प्यावे.
रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी चहाच्या अगोदर हे प्यावे जेणेकरून लवकर फरक पडेल.

सर्दीवर तुळशीची पाने उपाय 


तुळशीची पाने हि अॅंटीमायक्रोबियल गुणधर्मासाठी ओळखली जातात. याने सर्दी ठीक होण्यास मदत होते.

 • पाच सहा तुळशीची पाने घ्या, थोडेशे आद्रक घ्या
 • पाने आणि आद्रक बारीक करून घ्या
 • हे मिश्रण बारीक करून कोमात पाण्यामध्ये मिसळून घ्या.
 • दिवसातून दोन वेळा या पाण्याचे सेवन करा.

सर्दीवर घरगुती उपाय आद्रक ज्यूस


सर्दीवर आद्रक ज्यूस हा अत्यंत गुणकारी आहे. आद्रक मध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत. जे आपल्याला सर्दी पासून आपला बचाव करतात.

 • एक ग्लास पाणी घ्या. थोडेसे आद्रक घ्या
 • आद्रक कुटून बारीक करून घ्या.
 • पाण्यामध्ये बारीक केलेले आद्रक उकळून घ्या.
 • यामध्ये तुम्ही थोडासा मध देखील घेऊ शकता.
 • नंतर हा काढा गळून घ्या.

तुम्ही याचे सेवन सकाळी आणि रात्री करू शकता.
तुम्ही आद्रकाचे छोटे छोटे तुकडे तोंडामध्ये ठेऊन चघळू शकतात.
हा एक जुनाट सर्दीसाठी उपाय गुणकारी आहे.

दालचिनी साल आणि चहा


दालचिनी हि सर्दी ठीक करण्यासाठी रामबाण औषध आहे. तुम्हीहे फ्लू सारख्या साक्रमाना पासून आपले संरक्षण करते.
 • दालचिनी ची साल पाण्यामध्ये उकळून घ्या.
 • नंतर हे पाणी गाळून घेऊन त्यामध्ये एक चमच्या मध टाका.
 • दिवसातून एक ते दोन वेळा या दालचिनी च्या चहाचे सेवन करा.

सर्दीसाठी घरगुती उपाय लसून चे सेवन


लसून हा आपल्या शरीरामध्ये ब्लड प्युरीफायर चे काम करतो. सर्दी झाल्यावर ठीक करण्यासाठी लसून हा एक उत्तम घरगुती उपाय आहे.
 • लसणाच्या थोड्या पाकळ्या सोलून आणि ठेचून घ्या.
 • त्या मध्ये दोन तीन थेंब लिंबाचा रस मिसळून घ्या.
 • त्यात मध आणि चिमुट भर काळी मिरी घ्या
 • हे मिश्रण सर्दी पासून बरे वाटे पर्यंत सेवन करा.

सर्दी ठीक करण्यासाठी मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करणे 


सर्दी झाल्यावर आपल्या घाश्यामध्ये लाल होते. व घशात तडतड होते थोडासा खोकला आल्यासारखा होतो. अशा वेळेस मिठाच्या पाण्याच्या गुळण्या ह्या प्रभावी आहेत.

हा एक जुना घरगुती उपचार आहे आणि खूप प्रभावी देखील आहे.

हा उपाय खूप सोपा आहे. थोडे कोमट पाणी घेऊन त्यामध्ये थोडे मीठ मिसळून या पाण्याने गुळण्या करायच्या आहेत.

गाजराचा रस


सर्दी आणि थोडासा खोकला येत असेल तर गाजराचा रस हा गुणकारी आहे.

कोमट पाणी


सर्दी झाल्यावर साधे पाणी न पिता कोमट पाणी पिणे फायद्याचे राहील. याने सर्दी कमी होण्यास मदत होईल आणि घसा ठीक राहण्यास मदत होईल.

अंघोळ करताना तोंडात पाणी धरून ठेवणे


हा उपाय तुम्हाला थोडासा विचित्र वाटेल पण, तितकाच गुणकारी देखील आहे.

यामध्ये तुम्हाला अंघोळ करताना शक्य आहे तितके पाणी आपल्या तोंडात धरून ठेवायचं आहे तेही अंघोळ होई पर्यंत. हा उपाय तुम्ही एक आठवडा करून बघा! सर्दीवर खात्रीशीर फरक दिसेल.

सर्दी होण्याची काही प्रमुख कारणे

 1. ऋतुमानातील बदल (हिवाळा, पावसाला)
 2. पावसात भिजणे.
 3. संक्रमित लोकांच्या संपर्कात आल्यावर.
 4. रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे.
 5. पाण्यामध्ये बदल किंवा थंड पाणी पिणे


टिप्पणी पोस्ट करा

Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.
×