प्रजासत्ताक दिन निबंध मराठी भाषेत | Prajasattak din nibandh in marathi

प्रजासत्ताक दिन निबंध मराठी

प्रजासत्ताक दिन निबंध मराठी | Prajasattak din nibandh in marathi : प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी हा भारताचा प्रजासत्ताक दिन दर वर्षी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो याला गणराज्य दिन असेही म्हटले जाते. २६ जानेवारी १९५० रोजी भारताचे संविधान आमलात आले.१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा भारताचे स्वतःचे संविधान नव्हते. संविधान तयार करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली गेली.बरेच विचार विमर्श करुन सजानेवारी १९५० रोजी संपूर्ण राष्ट्रासाठी संविधान लागू करण्यात आले.

२६ जानेवारी या दिवशी नवी दिल्ली येथे राजपथ मार्गावरून एक मोठी परेड निघते जी भारताची संस्कृती आणि संरक्षण क्षमता दाखवून देते.बरेच लोक या ठिकाणी भेट देतात व राष्ट्रीय उत्सवाचा आनंद घेतात.या दिवशी देशातल्या शाळा व कार्यालयांमध्ये सदा प्रजासत्ताक दिन साजरा कला जातो. विध्यार्थ्यासाठी वक्तत्व, निबंध, चित्रकला स्पर्धा आयोजित केल्या जातात. अनेक ठिकाणी देशभक्तीपर सास्कृतिक कार्यक्रम आगाजित केले जातात.

नागरिक या दिवशी तिरंगी रंगाचे झेंडे, फुगे इत्यादींचा वापर करून घर व ऑफिस संशोभित करतात. लोक एकमेकांना गणराज्य दिनाच्या शुभेच्छा देतात.संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण दिसून येते.असा हा मजासत्ताक दिन दर वर्षी साजरा केला जातो व त्यामुळे प्रत्येकाच्या मनात राष्ट्रप्रेम अधिक उजळून निघते.


Nandkishor

मी लेखक आहे. मला लेखन करायला आवडतं! मी 4 वर्षांपासून ब्लॉग लेखन करत आहे. माझे लेखन मनोरंजक, उपयुक्त आहे आणि लोकांना स्वारस्य ठेवते. माझे लेख विशेष आहेत आणि लोकांना ते वाचायला आवडतात.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने